छतावरची चित्रं

A white number one painted on a textured red running track surface
a large blue number sitting on top of a lush green field
white spiral staircase near green trees during daytime
4 illustration
A large beige number five with a black drop shadow on green
gold balloon decor
A blue running track with white lane markings and a large number seven
A pool ball with the number eight on it

“छतावर चित्रं? चौथीच्या मुलांनी काढलीत? कशी? मुलं वर कशी चढली?”

मुलांनी छतावर काढलेल्या चित्रांबद्दल कुणालाही सांगितलं की असा प्रश्नांचा भडिमार सुरू होतो. हे कसं शक्य झालं असेल असं वाटतं. 

पण हे शक्य झालंय. आपल्या प्राथमिक शाळेत.

मुलांनी शाळेच्या व्हरांड्याच्या छतावर ‘उडती वाहनं’ या विषयावर चित्रं रंगवली. सिस्टाईन चॅपेलच्या छतावरली माइकल अँजेलोची चित्रं ही यामागची प्रेरणा. पण आज ठरलं आणि उद्या मुलं ‘अँजेलो’ झाली, असं नाही झालं. पहिली पायरी होती, विषय ठरवणं. तो मुलांनीच ठरवायचा होता. गाड्या हा मुलांच्या आवडीचा विषय आणि छतावर चितारायच्या म्हणजे त्या उडणाऱ्या गाड्या हव्यात… झालं, मुलांनी विषय ठरवला, ‘उडणाऱ्या गाड्या’! मग यावर चर्चा झाल्या, मुलांनी अनेक गोष्टींचं निरीक्षण केलं, आपल्या डोक्यातल्या गाडीची स्केचेस काढली… या सगळ्यातून त्यांना अधिक स्पष्टता येत गेली.

प्रत्यक्ष काम करण्याच्या दिवशी सुरक्षित परांची उभारल्या गेल्या. वर चढल्यावर मुलांना भीती वाटायला नको याची पूर्ण काळजी घेतली होती. तरीही शिडीवरून चढताना काहींना उंचीची थोडीशी भीती वाटली, जे साहजिक होतं; पण शिक्षकांचा आधार आणि मित्रांच्या सहकार्यामुळे त्यांनी तीही पार केली. मुलांनी साडेचार तास चिकाटीने छतावर चित्रं रंगवली. मान वर करून चित्रं रंगवणे हा सगळ्यात कठीण टप्पा होता. पण दोन गट करून आळीपाळीने चित्रं काढत हे काम पूर्ण झालं. या प्रक्रियेत मुलांनी केवळ चित्रं साकारली नाहीत, तर संवाद, सहयोग, समस्या सोडवणं, कल्पकता आणि चिकाटी यांसारखी महत्त्वाची जीवनकौशल्यंही आत्मसात केली.