अक्षरोत्सव

A white number one painted on a textured red running track surface
a large blue number sitting on top of a lush green field
white spiral staircase near green trees during daytime
4 illustration
A large beige number five with a black drop shadow on green
gold balloon decor
A blue running track with white lane markings and a large number seven

एकीकडे वेगवेगळ्या वयोगटासाठीच्‍या वेगवगळ्या प्रकारच्‍या पुस्‍तकांचं प्रदर्शन सुरू आहे. मुलं आणि मोठे येतायत, पुस्‍तकं चाळतायत, खरेदी करतायत. दुसरीकडे मुलांसाठी कधी नाटुकल्‍यांच्‍या माध्यमातून गोष्ट, तर कधी शब्‍दांशिवायची भाषा असलेलं ‘क्‍लाऊनिंग’ असे कार्यक्रम सुरू आहेत. आणि तिसरीकडे आहे आपल्‍या साहित्‍यिक, सांस्‍कृतिक वारशाचा उद्‌गार असणारा खुला कार्यक्रम… कधी महाराष्ट्राची लोकपरंपरा, कधी ‘हास्‍यजत्रे’तील कलाकारांच्‍या मुलाखती, तर कधी अजरामर गाण्‍यांमागच्‍या सुरेल गोष्टी सांगणारा कार्यक्रम… 

‘वाचाल तर वाचाल’ ही फक्‍त म्‍हण राहू नये, ते प्रत्यक्षातही यावं, यासाठी शिक्षण मंडळ, गोरेगाव आणि केशव गोरे स्मारक ट्रस्ट यांनी ‘अक्षरोत्सवा’ची सुरुवात केली. मात्र हा केवळ कार्यक्रमाचा उत्सव असू नये, त्याच्या जोडीला शाळेच्या पालकांना आणि परिसरातील नागरिकांना पुस्तकं पाहण्याची, विकत घेण्याची जागा मिळावी असाही विचार केला. शाळेतल्या मुलांसाठी वेगळे कार्यक्रम असावेत त्यातून नवीन काही पहायला मिळावं जे सहज बाहेर उपलब्ध नसतं, परवडणारं नसतं असं बघितलं. त्यातून शास्‍त्रज्ञ डार्विनची गोष्ट मुलांपर्यंत पोहोचली, तोत्तोचान ही आपल्‍याच वयाची जपानी मुलगी मुलांना नाटकातून भेटली. 

मुलांना वाचनाची गोडी लागावी, साहित्याचे विविध प्रकार समजावेत आणि पुस्तकांचं वैविध्य अनुभवता यावं, या उद्देशाने अक्षरोत्सवात पुस्तक प्रदर्शन भरवलं जातं. त्यात मुलांची तसेच मोठ्यांचीही पुस्तकं असतात. वेगवेगळ्या प्रकाशकांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो; एकदा भोपाळच्या एकलव्य प्रकाशनाची विशेषतः मुलांसाठीची हिंदी पुस्तकंही प्रदर्शनात होती. इंग्रजी पुस्तकं तर असतातच.

तीन किंवा चार दिवस चालणारा हा ‘अक्षरोत्‍सव’ फक्‍त शाळेतच नाही, तर संपूर्ण गोरेगावात एक माहौल तयार करून जातो.