प्रकल्प








“अरे खरंच पाण्याच्या खाली गेल्यासारखं वाटतंय रे…. सॉलिड! आपण असं कधी केलंच नाही.”
“पण ही हल्लीची मुलं मस्त करतात हं! आपल्यासारखं फक्त चार्ट आणि मॉडेल्स नाहीत.”
“आणि इंग्लिशमध्ये सांगतात याssर, आपण तर कधी विचारच नव्हता केला.”
१५ ऑगस्ट…साल कोणतंही. आपल्या शाळेतलं दृश्य तेच …
वर्गावर्गात प्रकल्प मांडलेले असतात आणि मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी प्रकल्प बघायला येतात. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणी उजळतात.
प्रकल्प पद्धत अभ्यासक्रमात यायच्या कितीतरी आधीपासून, १९५२ सालापासून शाळेत १५ ऑगस्टला प्रकल्प केले जातायत. पूर्वी एक वर्षआड काही इयत्तांना असणारे हे प्रकल्प, २००५ - ०६ मध्ये प्रकल्प पद्धत अभ्यासक्रमात आल्यापासून सगळ्याच इयत्तांचे होतात. एक विषय घ्यायचा आणि त्याचा सर्व अंगांनी विचार करायचा, हे पैलू वेगवेगळ्या माध्यमांतून सादर करायचे, असं त्याचं स्वरूप. पूर्वी एक वर्ग एक विषय घ्यायचा, आता संपूर्ण शाळेचा एक विषय असतो. प्रत्येक वर्ग त्याच्या एकेका घटकावर तपशीलवार काम करतो. (एक वर्ष ‘डोळा’ हा विषय घेऊन मुलं थेट ‘दृष्टिकोन’ या विषयापर्यंत गेली!) त्या त्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी एआयसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातोच, पण त्या त्या विषयांतले तज्ज्ञ बोलावून त्यांची मुलाखत मुलं घेतात आणि त्यातूनही प्रत्यक्ष ‘फील्ड’वरची माहिती मिळवतात.
काळानुरूप काही बदल होत गेले, ते होत राहाणारच आहेत. Artificial intelligence सारखे विषय, नवनवी माध्यमं मुलं चटकन सामावून घेत आहेत.
प्रकल्प ही संधी आहे मुलांना एकत्र विचार करण्याची, विषयाचा सखोल विचार करण्याची आणि तो दृश्य स्वरूपात परिणामकारकतेने मांडण्याची.