बाजार

A white number one painted on a textured red running track surface
a large blue number sitting on top of a lush green field
white spiral staircase near green trees during daytime
4 illustration
A large beige number five with a black drop shadow on green
gold balloon decor
A blue running track with white lane markings and a large number seven
A pool ball with the number eight on it

“ताईssss, यशकडची अंडी विकली जात नाहीयेssssत.”

“पण तुझ्याकडच्या सगळ्या वस्तू विकल्या की गं…” 

“हो ताईsss पण ती अंडी….”

“बरं, बघूया हं आपल्याला काय करता येतंय…”

मग सगळ्या मुलांनी खल केला, अंड्यांचा भाव पाडून ती यशने विकावीत असा सल्ला त्याला दिला आणि तोटा झाला पण अंडी विकली गेली, हे समाधान यशला मिळालं.

प्राथमिक शाळेतल्या बाजारातलं हे दृश्य होतं. मुलांना खरेदी - विक्रीचा खराखुरा संपूर्ण अनुभव मिळावा म्हणून प्राथमिक शाळेत दरवर्षी हा बाजार भरतो. त्या त्या वर्षाची चौथीची मुलं काय विकायचं हे ठरवतात. वरचा संवाद झाला त्या वर्षी नाजूक वस्तू विकायचं मुलांनी ठरवलं होतं. काचेच्या बांगड्यांपासून, मातीच्या शिट्या, फुगे… असं काय काय विकलं त्यांनी. एका वर्षी मुलांनी भाजी विकली. तेव्हा तर काही मुलं आपापला शेवटचा हिशोब पूर्ण झाल्यावर दमून तिथेच झोपलीही. कारण पहाटे भाजी बाजारात जाऊन त्यांनी विकण्यासाठीची भाजी खरेदी केली होती!

बाजाराच्या या अनुभवात बजेटिंग करण्यापासून ते वस्तूंची विक्री करून त्याचा पूर्ण हिशोब करण्यापर्यंत सगळं सगळं मुलंच करतात. जवळजवळ महिनाभर ही प्रक्रिया चालते. मुलं शाळेच्या परिसरातले, त्यांच्या घराजवळचे, वाटेतले बाजार पाहतात. त्यातल्या दुकानांचं, विक्रेत्यांचं निरीक्षण करतात. त्यांच्याशी गप्पा करतात, प्रश्न विचारतात. बाजारात असणाऱ्या वस्तूंमधल्या कोणत्या त्यांना त्यांच्या दुकानात विकायला ठेवायच्यात हे ठरवताना त्‍या किती ठेवायच्‍या, त्यासाठी किती भांडवल लागेल, असं गणित मुलं आणि ताई मिळून मांडतात. या सगळ्यातून दैनंदिन व्यवहार मुलांना कळतोच, पण विकणाऱ्यांच्या कष्टांचीही जाणीव होते.