रात्रशिबीर

A white number one painted on a textured red running track surface
a large blue number sitting on top of a lush green field
white spiral staircase near green trees during daytime
4 illustration
A large beige number five with a black drop shadow on green
gold balloon decor
A blue running track with white lane markings and a large number seven
A pool ball with the number eight on it

बालवाडीचं रात्रशिबीर सुरू आहे…

मुलांसाठी ताई एक कार्यक्रम सादर करणार आहेत. उत्सुकतेने मुलं बसलीयत आणि इतक्याsssत ….. खिडकीतून एक विदूषक उडी मारून मुलांसमोर येतो. मुलं आधी दचकतात आणि मग त्यांना मज्जा वाटायला लागते.

गेली पंचवीस वर्ष बालवाडीतून पहिलीत जाण्यापूर्वी एक रात्र मुलं शाळेत राहतात. या रात्रशिबिरात मुलांसाठी एक ‘सरप्राइझ’ नेहमी असतं. पण फक्‍त तेवढंच नाही…

शिबिराची तयारी एक महिना आधीपासूनच मुलांसोबत गप्पा करत सुरू होते. मुलं स्वतः खेळापासून जेवणापर्यंत सगळ्याला आवश्यक असणार्‍या सामानाची यादी तयार करतात, किराणा खरेदीसाठी दुकानात जाऊन वाणी सामान घेण्याचा अनुभवही घेतात.

प्रत्यक्ष शिबिराच्या दिवशी संध्याकाळी शाळेत आलेली मुलं दुसऱ्या दिवशी सकाळी घरी जातात. अनेक मुलांसाठी रात्री घरापासून, आईपासून दूर राहण्याचा हा पहिला अनुभव असतो. हे ही एकप्रकारचं शिकणंच. पुढे चौथीतून पाचवीत जाताना पुन्हा एकदा हा अनुभव मुलं घेतात. पण तोपर्यंत मोठी झालेली मुलं त्याचं पूर्ण प्लानिंगच करायला शिकलेली असतात. शिवाय ताईंचं नियोजन असतंच. त्यात त्या त्या वर्षीच्या मुलांच्या गटाचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन ताई विशेष अनुभवाचं नियोजन करतात. कधी मुलं वारली चित्रं काढून भिंत रंगवतात, तर कधी एखादं नाटुकलं स्‍वतःच बसवतात. शाळेतर्फे मुलांना पुस्तक भेट दिली जाते. पुस्‍तकं आणण्यासाठी जवळच्या किताब कॉर्नरमध्ये मुलं स्वतःच जातात. रात्री जेवल्यावर स्वतःचं ताट स्वतःच धुण्यापासून तंबूत बसून ऐकलेली गोष्ट, रात्री शाळेच्या परिसरात फिरणं असे सगळे अनुभव कायम मुलांच्या स्मरणात राहतात.